बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकातील गेल्या अनेक वर्षांपासून वापरात असलेला एक नंबर प्लॅटफॉर्मचा वापर प्रवाशांसाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतल्याने सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी तसेच इतर वेळीही प्रवाश्यांना तारसदायक ठरणार आहे. होम प्लॅटफॉर्मवरुनच बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये अत्याधुनिक सुविधा देण्याचे काम, रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. मुंबईच्या दिशेकडून ते अगदी कर्जतच्या दिशेकडे १२ मीटर लांबीच्या मोठ्या मुलाचे काम करण्यात येणार आहे. या पुलावर अत्याधुनिकदृष्ट्या सोयी देण्यात येणार आहे. मात्र हा पूल उभारण्यासाठी लागणारे खांब बांधण्यात येणार आहेत. फलाट क्रमांक एक व दोन वरील जागा अपुरी पडत असल्याने, रेल्वे प्रशासनाने एक नंबर फलाट पूर्णपणे बंद करुन त्या ठिकाणी पोलादी कुंपण घालण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे आता फलाट क्रमांक एक बंद झाल्यावर बदलापूरहुन मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होम प्लॅटफॉर्म झालेल्या फलाटावरुनच बदलापूर लोकलसाठी प्रवास करावा लागणार आहे.
कर्जतकडे जाणाऱ्या लोकलसाठी दोन नंबरचा फलाट सुरु ठेऊन, आता होम प्लॅटफॉर्म चे काम झाल्याने, हाच फलाट बदलापूरकरांना बदलापूर लोकलसाठी वापरता येणार आहे व आता सध्याचा एक नंबरचा फलाट कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे १२ मीटर लांबीच्या पुलाचे काम हाती घेण्यात आले असले तरी, हे काम पूर्ण होण्यास मे २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे समजते.