उद्योजक संजय पाटील यांना पितृशोक

ठाणे : उद्योजक संजय पाटील यांचे वडील रामदास पाटील यांचे दीर्घ आजाराने ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते.

संजय पाटील यांचे वडील माजी सैनिक होते. पाकिस्तान आणि चायनाच्या युद्धात रामदास पाटील यांचा सहभाग होता. तसेच आर्मीमध्ये हेवी वेट बॉक्सर म्हणून त्यांची ख्याती होती.

देश सेवेनंतर त्यांनी उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवला. आपल्या मुलांना उद्योजक होण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. स्किल कट्टा या संस्थेचे ते फाऊंडर होते. स्किल कट्ट्याच्या माध्यमातून रामदास पाटील यांनी स्किल वर्कर तयार करून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यांनी अनेक उद्योजक तयार केले. त्यांचे हे कार्य आपल्या मुलांनी चालू ठेवावे ही त्यांची शेवटची इच्छा असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले.