वाडा : भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा व निवडणूक काळात नियोजनबद्ध मेहनत करण्याची पद्धत हीच खरी पक्षाची ताकद असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
वाडा तालुक्यातील खुपरी येथे शुक्रवार (ता.२२) रोजी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करतांना श्री.चव्हाण बोलत होते.
भिवंडी लोकसभा क्षेत्रातील हा कार्यकर्ता मेळावा असून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, सुपरवाॅरियर व पक्ष कार्यकर्ते यांनी बुथ स्तरावर कशा स्वरुपात काम सुरू केले आहे, याचा थोडक्यात आढावा घेण्यात आला. भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करून मोदींचे हात बळकट करावेत असे आवाहन पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
या मेळाव्यास प्रदेश सचिव सुरेखा थेतले, लोकसभा सहप्रभारी बाबाजी काठोळे, लोकसभा संयोजक जितेंद्र डाकी, पालघर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकुमार पाटील, विक्रमगड विधानसभा प्रमुख डाॅ.हेमंत सवरा, अमित घोडा, विलास तरे, पंकज कोरे,सुशील औसरकर, योगेश पाटील, संदीप पवार, कृष्णा भोईर, राजेंद्र पाटील, नरेश आक्रे, शुभांगी उतेकर, मेघना पाटील, धनश्री चौधरी, अर्चना भोईर, महीला आघाडी तालुकाध्यक्षा अंकिता दुबेले, अश्विनी शेळके, नवनिर्वाचित वाडा मंडळ सरचिटणीस दिक्षा पाटील,
मनिष देहेरकर, रोहन पाटील, कुणाल साळवी, दिनेश पाटील, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष संदीप दुपारे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष नितिन घरत, जगन्नाथ पाटील, अरुण गौंड, दिलीप पाटील, विजय पाटील, दिपक मोरे, दिनेश पांडे, राजेंद्र चातुर्य आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.