ठाणे : तळाच्या पार्थ बोडके आणि तनिष साळुंकेने केलेल्या चिवट फलंदाजीच्या जोरावर मुंबई क्रिकेट अकॅडमीने केवळ एक विकेट राखून हिरानंदानी फाऊंडेशन स्कुलचा पराभव करत १७ वर्षे वयोगटाच्या मास्टरस्ट्रोक प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.
संघ अडचणीत असताना पार्थ आणि तनिषने नवव्या विकेटसाठी नवव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी करत प्रतिस्पर्ध्याच्या १७३ धावांच्या आव्हानाला १७७ धावांचे उत्तर देत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
हिरानंदानी फाऊंडेशन स्कुलच्या १७३ धावांचा पाठलाग करताना पार्थ घोणे आणि हिरण्य ठक्करने संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. पण हे दोघेही बाद झाल्यावर मुंबई क्रिकेट अकॅडमीचा डाव ढेपाळला. पराभवाच्या छायेत असताना पार्थने ४१ आणि तनिषने नाबाद ३१ धावांची खेळी करत संघाला विजयी केले. पार्थ घोणेने २५, हिरण्य ठक्करने २८ धावा बनवल्या. रुद्र गौरीने चार आणि वेदांत आनंदने दोन बळी मिळवले. त्याआधी विवान नरसिंघानी, वेदांत आनंद आणि अक्षित पत्कीने संघाला दिड शतकी धावसंख्येत मोलाचे योगदान दिले.विवानने ३६, वेदांतने २७ आणि दिक्षितने २३ धाव केल्या. या डावात देवांशु भावासारने २९ धावांत तीन, तन्मय रेणुसे, अभिनव पिल्ले, हर्ष यादव आणि पार्थ राणेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.