ठाणे-पालघरमधील गृहखरेदीदारांना १६ कोटींहून अधिक भरपाई

महारेराच्या सलोखा मंचांनी केला १७४९ तक्रारींचा निपटारा

ठाणे : गृहखरेदीदारांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे प्रकार वाढीस लागल्याने राज्य शासनाने महारेराची स्थापना केली. या प्राधिकरणाने सुरू केलेल्या सलोखा मंचाच्या माध्यमातून ठाणे-पालघर जिल्ह्यातील गृह खरेदीदारांना १६ कोटींहून अधिक नुकसान भरपाई मिळवून देण्यात महारेरा यशस्वी ठरले आहे.

‘महारेरा’मुळे तक्रारदारांचा सलोखा मंचला वाढता प्रतिसाद मिळाला असल्यामुळे सध्या 553 तक्रारींची सुनावणीची प्रक्रिया सुरू सलोखा मंचांपुढे सुरू आहेत. सलोखा मंचला ६० दिवसांत आणि अपवादात्मक स्थितीत 90 दिवसांत तक्रारींवर निर्णय घेणे बंधनकारक असल्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर अशा अनेक ठिकाणी 52 सलोखा मंच कार्यरत झाले आहेत.

‘2 डिसेंबरपर्यंत घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईचे तब्बल 200.23 कोटी रुपये वसुल करून देण्यात महारेरा यशस्वी झाले आहे. यात ठाणे जिल्हा 11.65 कोटी रुपये, मुंबई शहर 46.47 कोटी रुपये, मुंबई उपनगर 76.33 कोटी रुपये, पुणे 39.10 कोटी रुपये, नागपूर 9.650 कोटी रुपये, पालघर 4.49 रुपये, रायगड 7.49 कोटी रुपयांचा समावेश आहे.

महारेराने आतापर्यंत घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईचे तब्बल 200 कोटी रुपये वसूल केले असून यात मुंबई शहर 46.47 कोटी, मुंबई उपनगर 76.33 कोटी, पुणे 39.10 कोटी, ठाणे 11.65 कोटी, रायगड 7.49 कोटी, पालघर 4.49 कोटी, नाशिक-नागपूर 9.65 कोटी, संभाजीनगर 3.84 कोटी रुपये आदींचा समावेश आहे.

मुंबई शहरातील 19 प्रकल्पांतील 35 वॉरंट्सपोटी 85.79 कोटी देय आहेत. त्यापैकी 13 प्रकल्पांतील 22 वॉरंट्सपोटी 46.47 कोटी वसूल झाले आहेत. मुंबई उपनगरमध्ये 115 प्रकल्पांतील 440 वॉरंट्सपोटी 304.45 कोटी देय आहेत. त्यापैकी 42 प्रकल्पांतील 85 वॉरंट्सपोटी 76.33 कोटी वसूल करण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील 81 प्रकल्पांतील 191 वॉरंट्सपोटी 62.58 कोटी देय असून यापैकी 15 प्रकल्पांतील 27 वॉरंट्सपोटी 11.65 कोटी वसूल झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील 32 प्रकल्पांतील 79 वॉरंट्सपोटी 19.86 कोटी रुपए देय असून, यापैकी सहा प्रकल्पांतील आठ वॉरंट्सपोटी 4.49 कोटी रुपये वसूल झाले आहेत.