मुंबई : मंगळवारी जाहीर झालेल्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार नामांकनांमध्ये ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाचा समावेश असून अन्य कोणत्याही भारतीय चित्रपटाला यात स्थान मिळालेले नाही. हॉलीवूड अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅचची मुख्य भूमिका असलेल्या ‘द पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकने मिळाली आहेत.
‘रायटिंग विथ फायर’ हा रिंटू थॉमस आणि सुश्मित घोष दिग्दर्शित माहितीपट असून त्याला याआधी सनडान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक आणि प्रेक्षक पसंतीचा असे दोन पुरस्कार मिळाले आहेत.
वॉर्नर ब्रदर्सची निर्मिती असलेल्या ‘डय़ून’ या चित्रपटाला दहा नामांकने मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागात ‘द हँड ऑफ गॉड’, ‘लुनाना: अ याक इन द क्लासरूम’, ‘द वस्र्ट पर्सन इन द वल्र्ड’, ‘ड्राईव्ह माय कार’ आणि ‘फ्ली’ या चित्रपटांना नामांकन जाहीर झाले आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागासाठी ‘बेलफास्ट’, ‘कोडा’, ‘डोन्ट लूक अप’, ‘डय़ुन’, ‘ड्राईव्ह माय कार’, ‘किंग रिचर्ड’, ‘लिकोरिस पिझ्झा’, ‘नाईटमेअर अॅली’, ‘द पॉवर ऑफ द डॉग’ आणि ‘वेस्ट साइड स्टोरी’ या चित्रपटांना नामांकने मिळाली आहेत.
ट्रेसी एलिस रॉस आणि लेस्ली जॉर्डन यांनी ही यादी जाहीर केली.