एसएसटी महाविद्यालयात पर्यावरण जागृती मोहिमेचे आयोजन

कल्याण : एसएसटी महाविद्यालयात उल्हासनगर महानगर पालिकेच्या सहयोगाने माझी वसुंधरा पर्यावरण जागृती मोहिम आयोजित करण्यात आली होती. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या निमित्ताने ही मोहीम आयोजित केली गेली. याप्रसंगी उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त डॉ. सुभाष जाधव आणि उल्हासनगर महानगर पालिकेच्या पर्यावरण विभागप्रमुख विशाखा सावंत हे उपस्थित होते. त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात एसएसटी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य आणि फ्लॅश मॉब सादर केले. महाविद्यालयाच्या एनएसएस आणि डीएलएलइ विभागांनी संयुक्तपणे कार्यक्रमाचे आयोजन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल तेलिंगे यांनी केले. या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि संस्थापक प्राचार्य डॉ.पुरस्वानी, उपप्राचार्य आणि एनएसएसचे जिल्हा समन्वयक प्रा. जीवन विचारे हे उपस्थित होते.