ठाणे: स्व.आनंद दिघे यांची परंपरा कायम राखत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने श्री गणेश दर्शन स्पर्धा 2023 आयोजित केली असल्याची माहिती शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिली.
स्पर्धेचे हे 31 वे वर्षे आहे. स्पर्धा ठाणे जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे. या स्पर्धेत ठाणे शहरासाठी प्रथम पारितोषिक एक लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 75 हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह, तृतीय पारितोषिक 50 हजार रुपये, चतुर्थ पारितोषिक 25 हजार रुपये, पाचवे पारितोषिक 21 हजार रुपये आणि 6 ते 10 क्रमांकापर्यंत प्रत्येकी 15 हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. तीन विशेष पारितोषिके असून त्यांना 10 हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह, उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास 10 हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह, दोन उत्कृष्ट मूर्तीकार 10 हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह तर उत्तेजनार्थ पारितोषिके 15 असून 10 हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह ठेवण्यात आले आहे. आदर्श विसर्जन मिरवूणक काढणाऱ्या मंडळास 21 हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह तर उत्कृष्ट सजावटकारास 10 हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.
कल्याण शहर (सजावटीसाठी) प्रथम पारितोषिक 25 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 21 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 15 हजार रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक 10 हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह ठेवण्यात आले आहे. उत्कृष्ट मूर्तीसाठी प्रथम पारितोषिक 11 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक सात हजार ५०० रुपये, तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह तर उत्तेजनार्थ पारितोषिक आणि पाच हजार रुपये स्मृतीचिन्ह ठेवण्यात आले आहे.
सर्व नियम व अटी मान्य आहेत असे गृहित धरुनच मंडळाचे प्रवेश अर्ज स्विकारले जातील. स्पर्धेचे प्रवेश अर्ज 16 ते 21 सप्टेंबर 2023 या कालावधीत आनंदाश्रम, टेंभीनाका आणि शिवसेना शाखा किसननगर क्र. 2 ठाणे येथे उपलब्ध आहे.