ठाणे: शहरातील कोरोनाच्या रूग्ण वाढीला ब्रेक लागला असून आज अवघे दोन नवीन रूग्ण सापडले आहेत.
शहरातील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रूग्णांपैकी सहा रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ९५,१७९जणांनी कोरोनावर मात केली आहे तर रुग्णालयात सहा आणि घरी ३७ अशा एकूण ४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २१६४जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ४३१ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये अवघे दोन जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २५ लाख ४६,१६२ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ९७,३८६रूग्ण बाधित सापडले.