ठाण्यात कोरोनाचे नवीन रुग्ण अवघे तीन

ठाणे : शहरातील नविन कोरोनावाढ मंदावली असून आज फक्त तीन नवीन रूग्ण सापडले आहेत.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी आठ जण कोरोनामुक्त झाले असून आत्तापर्यंत एक लाख ९५,१७५ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्णालयात आणि घरी ४७जणांवर उपचार सुरू असून आत्तापर्यंत २१६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील ४१२ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये तीन जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २५ लाख ४५,७३१ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ९७,३८४जण बाधित सापडले आहेत.