ठाणे : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या किंचित वाढली आहे. आज सात रूग्ण सापडले आहेत तर ठाणे शहरात एक रूग्ण मिळाला आहे. शहरात नऊ सक्रिय आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक तीन रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर आणि ठाणे ग्रामिण परिसरात प्रत्येकी एका रुग्णाची भर पडली आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत सात लाख ४७,३६५जण बाधित सापडले आहेत. रुग्णालयात आणि घरी ३६जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत सात लाख ३६,१२२ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर आत्तापर्यंत ११,९६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.