ठाणे : शहरात फक्त एका नवीन रुग्णाची भर पडली आहे तर तीन जण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णांचा आकडा पहिल्यांदाच १०च्या खाली गेला आहे.
महापालिका हद्दीत फक्त उथळसर प्रभाग समिती येथे एका रुग्णाची भर पडली आहे. उर्वरित आठ प्रभाग समिती क्षेत्रात नवीन एकही रूग्ण सापडला नाही. विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी तीन जणांनी कोरोनावर मात के ली आहे. आत्तापर्यंत एक लाख ८१,५४९जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले
आहेत तर रुग्णालयात एक आणि घरी आठ असे के वळ नऊ रूग्ण ठाण्यात सक्रिय उरले आहेत. सुदैवाने आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २१२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील २२५ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये एक रूग्ण बाधित सापडला आहे. आत्तापर्यंत २४ लाख ६,२०९ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,६८५जण बाधित मिळाले आहेत.