ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या किंचित कमी झाली असून आज ४६ नवीन रुग्णांची भर पडली. सुदैवाने आज एकही रूग्ण दगावला नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी १४८जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ९३,३७३ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात अवघे ५० आणि घरी ४७७ अशा एकूण ५३१जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २,१५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ४९० नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये ४६जण बाधित सापडले. आत्तापर्यंत २५ लाख १५,४४४ ठाणेकरांची चाचणी घेतली असून त्यामध्ये एक लाख ९६,०५८ बाधित मिळाले आहेत.