ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज ४४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तीन प्रभाग समित्यांच्या हद्दीत शून्य रूग्ण सापडले आहेत ६१जण कोरोनामुक्त झाले आहेत तर रुग्णालयात फक्त २७जणांवर उपचार सुरू आहेत.
महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सर्वात जास्त २५रूग्ण माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सापडले आहेत. पाच रूग्ण लोकमान्य-सावरकरनगर आणि चार जण वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात वाढले आहेत. प्रत्येकी तीन रूग्ण नौपाडा-कोपरी आणि दिवा प्रभाग समिती भागात मिळून आले आहेत. दोन जणांची भर उथळसर प्रभाग समिती येथे पडली आहे तर वागळे, कळवा आणि मुंब्रा प्रभाग समिती परिसरात एकही रुग्ण सापडला नाही. दोन रुग्णांचा घरचा पत्ता मिळाला नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी ६१जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८०,६३०रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ४३९ जणांवर उपचार सुरू आहेत. आज एकाचाही मृत्यू झाला नसून आत्तापर्यंत २,१२६ दगावले आहेत.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील १,७४१ नागरिकांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये ४४जण बाधित सापडले आहेत. आत्तापर्यंत २३ लाख ६७,४५० ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,१९४जण बाधित मिळाले आहेत.