रिक्षावर झाड पडून एकाचा मृत्यू

रुणवालनगर, फ्लॉवर वॅली येथे गुलमोहराचे झाड एका रिक्षावर पडले. यात तौफिक सौदागर (२७) राहणार गोदावरी बिल्डिंग, राबोडी यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले. रिक्षाचालक शफीक शब्बीर (५५) राहणार राबोडी यांच्या डोक्याला दुखापत झाली असून उपचाराकरिता नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.