तिसरी-चौथी मार्गिका रुळावर; वनविभागाचा अडथळा दूर

कल्याण आणि बदलापूरच्या कामांना गती

ठाणे : ठाणे पलिकडे असलेल्या तिस-या आणि चौथ्या मार्गिकांच्या कामांमधील वनविभागाचा अडथळा अखेर दूर झाला आहे. या प्रकल्पासाठी वन विभागाने 0.25 हेक्टरची वन जमीन मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) ताब्यात दिली आहे. त्यामुळे कल्याण आणि बदलापूरच्या कामांना गती मिळाली असून तिस-या चौथ्या मार्गिकेतील अडथळा दूर होणार आहेत.

हा प्रकल्प ‘एमयूटीपी-तीन अ ’ याच्या अंतर्गत असून त्याला मंजुरी 2019 रोजी देण्यात आली होती. त्याचा खर्च 33 हजार 690 कोटी रुपये आहे. आणि कल्याण-बदलापूर तिसऱ्या मार्गिकांसाठीही 1510 कोटी रुपये खर्च होणार आहेत. या मार्गिकेवर एक मोठा आणि 48 लहान पूल व चार रेल्वे उड्डाणपूल होणार आहेत. या पादचारी पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आला.

ठाणे जिल्हाधिका-यांकडून जमिनीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून खाजगी 9.9 हेक्टर सेक्टर सरकारी 2.83 हेक्टर आणि वनजमीन झिरो.पॉईंट 25 हेक्टर असा हा जमिनीचा प्रस्ताव आहे,अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
डिसेंबर 2026 मध्ये या प्रकल्पाची अनेकविध कामे करून ते पूर्ण करण्याचे नियोजन ‘एमआरव्हीसी’ने केले आहे. त्यामुळे दोन नव्या मार्गिकांच्या उभारणीनंतर लोकल आणि मेल एक्सप्रेस यांच्यासाठीदेखील स्वतंत्र मार्ग निर्माण होऊन या संपूर्ण भागांमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. या प्रकल्पात विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, चिखलोली आणि बदलापूर स्थानकांचे सामान्य आरेखन मंजूर झाले आहे आणि प्रकल्पाचे ड्Ñोन सर्वेक्षण पूर्ण झाले असून प्रकल्पाचेही संलेखन मंजूर झाले आहे.

आजपर्यंत 5.68 हेक्टर खाजगी जमीन आणि 2.83 सेक्टर सरकारी जमिनीचा ताबा रेल्वेकडे आहे आणि बाधित जमीन संपादनासाठी नोटीसा दिल्या असून जागेची किंमत निश्चित झाली आहे. खाजगी जागेच्या संपादनासाठी तब्बल 134.64 कोटींचा निधी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.