नव्या नात्यांच्या बंधूगाठी म्हणत नव्याने सुरु झालेल्या मन उडू उडू झालं, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं आणि माझी तुझी रेशीमगाठ या मालिकांनी अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकून घेतली, आता ह्याच मालिकांचे महाएपिसोड ३१ ऑक्टोबर ला रविवारी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत.
मन उडू उडू झालं मध्ये, दिपू चे बाबा म्हणजेच देशपांडे सर गावातून येतात, इकडे स्नेहलता समोर सानिका कार्तिक च प्रकरण सगळ्यांसमोर येत स्नेहलता त्यावरून मोठा तमाशा करते आणी लग्न मोडते. सानिका दिपू ला सगळा माहित असल्याच ऐकुन् बाबा कोलमडतात दिपू त्यांना शब्द देते की त्यांचा संस्काराना धक्का लागेल अस ती वागणार नाही. ह्या सर्व घडामोडीत इंद्रा दिपू च्या प्रेमात पडल्याची कबुली देतो. ह्या प्रेमाच्या कबुलीवर काई असणार दिपूच उत्तर.
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मध्ये अदिती आणि सिद्धार्थच्या साखरपुड्यासाठी संपूर्ण गोकुळनिवास तयारी करतंय
माझी तुझी रेशीमगाठ मध्येबंडूकाका खूप दिवसांनी परीला पाहातात आणि त्यांना पॅनिक अटॅक येतो. नेहा आणि काकू त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात. परी या प्रकाराने घाबरुन जाते आणि रडत यशला फोन करते. यश तिला भेटायला येतो असं सांगतो. आजोबा समीरसोबत हार्ट अटॅक आल्याचा बहाणा करतात. यश या प्रकाराने घाबरुन जातो आणि आजोबांचं नाटक यशस्वी होतं यश त्यांना वचन देतो की मी लग्न करेन.
तेव्हा पाहायला विसरूनका’मन उडू उडू झालं’, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!’ आणि ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकांचे महाएपिसोड रविवार ३१ ऑक्टोबर संध्याकाळी ७ ते ९ फक्त आपल्या झी मराठीवर.