ठाणे : गेल्या कित्येक वर्षांपासून ठाणे स्थानकात दररोज अहोरात्र प्रवाशांची गर्दी वाढतच असताना, त्यात जुना पादचारी पूल (फुट ओव्हर ब्रिज) 28 मार्च 23 पासून तात्पुरता बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
इतर चार पूल प्रवाशांकरीता खुले असले तरी, त्यावर रोज सकाळी ते रात्रीपर्यंत प्रवाशांंची अतोनात गर्दी होणार असल्यामुळे तेथे रेल्वे सुरक्षा बलाचे जवान, विशेषत: महिलांंच्या रक्षणासाठी तैनात करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. फलाट क्रमांक ९/ १० (मुंबई-एंडच्या दिशेने) ठाणे स्थानकातील जुना पादचारी पूल तात्पुरता बंद करण्यात येणार असल्यामुळे त्याचा दैनंदिन वापर करणा-यांना त्रास सोसावा लागणार आहे. मध्य रेल्वेने याची माहिती गेल्या आठवड्यात निदान शुक्रवारी, शनिवारी द्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने व्यक्त केली.
छशिमट -एंडच्या दिशेने ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र ९-१० मधील जुना फूट ओव्हर ब्रिजचा(एफओबी) जिना २८ मार्चपासून दुरुस्ती करण्यासाठी १० दिवस बंद असेल. फलाट क्र. ९/१० मधील इतर चार पूल प्रवाशांना प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी किंवा स्टेशनच्या बाहेर जाण्यासाठी उपलब्ध असतील.