ठाणे : लेग स्पिनर अद्वैत कचराजच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीमती सुलोचनादेवी सिंघनिया स्कुलने एस. एम. शेट्टी स्कुलचा १० विकेट्सनी धुव्वा उडवत मुंबई शालेय क्रिडा संघटना आयोजित १४ वर्षाखालील मुलांच्या गाईल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. प्रतिस्पर्ध्यांना अवघ्या २३ धावांत गुंडाळल्यावर श्रीमती सुलोचनादेवी सिंघनिया स्कुलने चार षटकात २४ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या एस एम शेट्टी स्कुलचा एकाही फलंदाजाला अद्वैत कचराजच्या माऱ्यासमोर वैयक्तिक पाच धावांचा पल्ला पार करता आला नाही. अद्वैतने चार निर्धाव षटकांसह १० धावांत सात फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. वीर धुमाळने दोन धावांत ३ बळी मिळवले. श्रीमती सुलोचनादेवी सिंघनिया स्कुलच्या मिहीर नाईक आणि निर्मित धुरीने संघाचे कुठलेही नुकसान होऊ न देता २४ धावासह दुसऱ्या फेरीतील स्थान पक्के केले. मिहिरने नाबाद १४ आणि निर्मितने नाबाद ३ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : एस.एम.शेट्टी स्कुल : १५ षटकात सर्वबाद २३ ( अंश हडवळे ५, अद्वैत कचराज ८-४-१०-७, वीर धुमाळ १-०-२-३) पराभूत विरुद्ध श्रीमती सुलोचनादेवी सिंघनिया स्कुल : ३.४ षटकात बिनबाद २४ (मिहीर नाईक नाबाद १४, निर्मित धुरी नाबाद ४).