साहित्य :
ओट्स १ कप
हिरवी मूगडाळ १/२ कप
१ चिरलेला कांदा
१ चिरलेला टोमॅटो
तूप २ चमचे
हिंग, जिरे, राई, लसूण, २ कोरड्या लाल मिरच्या, कढीपत्ता फोडणीसाठी.
1 टीस्पून लाल मिरची पावडर
1/2 टीस्पून हळद
१/२ टीस्पून गरम मसाला पावडर
पाणी
मीठ
कृती :
प्रेशर कुकर घ्या. त्यात तूप घाला. नंतर वर नमूद केलेले सर्व फोडणीचे साहित्य घाला. कांदा मऊ होईपर्यंत परतावा, नंतर टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परतावे. नंतर सर्व मसाले घाला.
परतून घ्या. धुतलेले ओट्स आणि हिरवी मूगडाळ घाला. चांगले मिसळून घ्या. खिचडी बनवण्यासाठी ४ कप पाणी घाला. प्रेशर कुकरच्या 3 शिट्ट्या देऊन शिजवून घ्या. दही किंवा कोणत्याही सॅलड सोबत ओट्स आणि हिरवी मूगडाळ खिचडीचा आनंद घ्या.
टीप :- ओट्स हेल्दी आहेत, हिरवी मूगडाळ देखील आरोग्यदायी आहे.
जे डाएट करत आहेत त्यांना ही डिश उत्साही ठेवते.
ओट्स ऐवजी तुम्ही दलिया देखील वापरू शकता. त्यात तुम्ही भरपूर भाज्या वापरू शकता. ही रेसिपी तुम्ही चिरलेली पालक टाकूनही बनवू शकता.
प्रीती डोके
पाकसिद्धी कूकिंग क्लासेस