ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा खाली आला आहे. ९५ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सुदैवाने आज एकाचाही मृत्यू झाला नाही. तर रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३,८९७ दिवसांवर गेला आहे.
महापालिका हद्दीतील तीन प्रभाग समिती क्षेत्रात शून्य तर तीन प्रभागात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. सर्वात जास्त १२ रूग्ण माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती भागात वाढले आहेत. पाच रूग्ण वर्तकनगर आणि चार रूग्ण वागळे प्रभाग समिती येथे आढळले आहेत. लोकमान्य-सावरकर, मुंब्रा, आणि दिवा प्रभाग समितीमध्ये प्रत्येकी शून्य रूग्ण सापडला आहे तर नौपाडा-कोपरी, कळवा आणि उथळसर प्रभाग समिती परिसरात प्रत्येकी एक रूग्ण मिळाला आहे.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी ९५जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८०,७२५जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ३६८जणांवर उपचार सुरू आहेत.यातील अवघे २२ रुग्ण रुग्णालयात आहेत. सुदैवाने आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१२६जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील १,२६२जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये २४जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २३ लाख ६८,७१२ नागरिकांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये एक लाख ८३,२१८ जण बाधित मिळाले आहेत.