आपला सावत्र भाऊ असीम याची काळजी निवेदिता घेणार !

निवेदितामाझी ताई!’ सोमते शुक्ररात्री  वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर!

मालिका आणि प्रेक्षक यांचं अतूट नातं विणणारी लोकप्रिय वाहिनी म्हणजे सोनी मराठी. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मोठ्या दिमाखात सोनी मराठी एक नवी  मालिका, ‘निवेदिता, माझी ताई!’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली. ही गोष्ट एका अशा नात्याची आहे जी घराघरांत घडते.. एक असं नातं ज्यामुळे प्रत्येक घराला घरपण लाभतं. एक असं निरपेक्ष नातं, जे एकमेकांवर जीव ओवाळून टाकतं… ते नातं म्हणजे… बहीण आणि भाऊ यांचं अतूट नातं. संपूर्ण मालिका बहीण आणि भाऊ यांच्या अनोख्या प्रेमावर आधारित अशी गोष्ट आहे. असीम आणि निवेदिता यांची ही प्रेमळ गोष्ट प्रेक्षकांना विशेष आवडते आहे.  ‘निवेदिता, माझी ताई!’ ही सुंदर मलिका वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच १५ जानेवारीपासून सोम. ते शुक्र. रात्री ९.०० वा. प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे. प्रेक्षकांचा आवडता अशोक फळदेसाई हा यशोधनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. ही नवी भूमिका तो अतिशय चांगल्या पद्धतीने साकारतो आहे आणि प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतो आहे. अभिनेत्री ऐतशा संसगिरी ही गुणी अभिनेत्री या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकते आहे. निवेदिताच्या भूमिकेत ती उत्तम कामगिरी करते आहे.

पण मालिकेने आता वेगळे वळण घेतले आहे. निवेदिताच्या वडिलांचे दुसरे लग्न झाले असून त्यांना एक मुलगादेखील आहे, हे निवेदिताला समजतं आणि निवेदिता आपल्या वडिलांना याचा जाब विचारते. पण तिला त्यांच्याकडून ठोस उत्तर मिळत नाही. ती वडिलांवर फार नाराज आहेच, पण त्यांच्या लग्नाच्या २५व्या वाढदिवशी ही बातमी सगळ्यांना समजल्यावर  मालिकेने आता वेगळे वळण घेतले आहे. निवेदिता आणि इतर सगळ्यांना असे समजले आहे की असीम हा निवेदिताचा सावत्र भाऊ आहे. हे सगळ्यांना समजते आणि त्याच क्षणी निवेदिताच्या वडिलांच्या दुसऱ्या बायकोचा म्हणजेच असीमच्या आईचा अपघात होतो आणि त्यात तिचा मृत्य होतो. आता मात्र असीम एकटा पडणार म्हणून निवेदिता त्याच्या पाठीशी उभं राहायचं असं ठरवून ती त्याला आपल्या घरी राहायला घेऊन येते. असीमच्या घरी येण्याने निवेदिताची आई आणि भाऊ यांचा राग निवेदिताला सहन करावा लागतो, पण निवेदिता त्यांच्या विरुद्ध जाऊन असीमला आपल्यासोबत ठेवायचा निर्णय घेते. आपल्या सावत्र भावाचं आता या जगात कोणी नाही म्हणून यापुढे ती त्याची काळजी घेणार, असं ती सांगते. तिच्या या निर्णयाने घरातील वातावरण फार बिघडले असून असीम घरी आल्यानंतर निवेदिताच्या घरातील वातावरण बदलले आहे. असीमच्या येण्याने  निवेदिताच्या आयुष्यात काय बदल होतील, हे पाहणे रंगतदार असणार आहे.

असीम घरी आल्यामुळे निवेदिताला फार गोष्टींचा विरोध सहन करावा लागणार आहे. त्यामुळे यशोधन आणि निवेदिता यांच्या चांगल्या संबंधांमध्ये काही बदल होतील का, यशोधन निवेदिताला पाठिंबा देईल का, या निर्णयात तो तिला साथ देईल का, हे आता पाहायला मिळेल. मालिकेत आता पुढे काय होणार याची प्रेक्षकांना विशेष उत्सुकता लागली असून कधी प्रेमाने तर कधी लबाडीने आपल्या निवेदिता ताईला कायम आपल्याजवळ ठेवू पाहणारा असीम आणि निवेदितासोबत आपल्या भावी आयुष्याची स्वप्नं पाहणारा यशोधन यांची गमतीशीर गोष्ट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात काही शंका नाही.  सोनी मराठी वाहिनीवरील ‘निवेदिता, माझी ताई!’ ही मालिका बहीण-भावाच्या नात्यांचे अनोखे बंध उलगडणार असून ती सोम. ते शुक्र. रात्री ९ वा. प्रसारित होते आहे. भावा-बहिणीच्या प्रेमळ नात्याची ही गोड गोष्ट पाहायला विसरू नका ‘निवेदिता माझी ताई’.