ठाणे : ब्रह्माळा तलाव ज्येष्ठ नागरिक संघ आणि इलेक्ट्रिक सायकलच्या निर्मितीच्या उदघाट्न कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी उद्या ठाण्यात येत असून ते देशातील आणि राज्यातील सद्यस्थितीबद्दल काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुप्रसिद्ध निवेदक, सुधीर गाडगीळ यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्री. गडकरी हे सकाळी ११ वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे येणार आहेत. तर दुपारी १ वाजता टीसा येथे इलेक्ट्रिक सायकल निर्मितीच्या शो रूमचे उदघाट्न श्री. गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमात सडेतोड मत मांडणारे श्री. गडकरी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.