ठाणे: शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा किंचित कमी झाला आहे. आज नवीन नऊ रुग्णांची भर पडली तर अकरा जण रोगमुक्त झाले आहेत. सलग तीन दिवस रुग्णालयात एकाही रुग्णाला दाखल करण्याची वेळ आली नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी ११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,६९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर रुग्णालयात मागील तीन दिवसांपासून एकाही रुग्णास दाखल करण्याची वेळ आली नाही. घरी ८८जणांवर उपचार सुरू आहेत. आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून आत्तापर्यंत २,१३०जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ६६१ नागरिकांची चाचणी घेतली. त्यामध्ये नऊ जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २४ लाख १८,४४५ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,९०९जण बाधित सापडले आहेत.