येत्या शनिवारी-रविवारी मेगा ब्लॉक

ठाणे : उद्या शनिवारी आणि रविवारी (ता. २४) मध्य रेल्वे मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक करणार आहे.

भाययखळा ते माटुंगा अप आणि डाउन जलद मार्गावर  (मध्यरात्री ते सकाळ) अप जलद मार्गावर दि. २३ जुलैच्या रात्री ११.३० पासून २४ जुलैच्या पहाटे ४.०५ पर्यंत आणि २४ जुलै रोजी मध्यरात्री १२.४० ते पहाटे ५.४० पर्यंत डाऊन जलद मार्गावर. या मेगा ब्लॉकमुळे  उपनगरीय गाड्यांचे मार्गबदल होणार आहेत. छशिमटहून २४ जुलै रोजी सकाळी ५.२० वाजता  सुटणारी डाउन जलद मार्गावरील लोकल भाययखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

ठाण्याहून २३ जुलै रोजी रात्री १०.५८ आणि रात्री ११.१५ वा. सुटणा-या अप जलद मार्गावरील लोकल माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यांच्या संबंधित निर्धारित थांब्यांनुसार थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटांनी गंतव्यस्थानी पोहोचतील.

मेल/एक्स्प्रेस गाड्यांचेही मार्गबदल

ट्रेन क्र. 12051 छशिमट- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भाययखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. दादर फलाट क्र. येथे दुहेरी थांबा देण्यात येईल आणि १० ते १५ मिनिटे उशिराने पाठविण्यात येईल. गाडी क्र. 11058 अमृतसर-छशिमट एक्सप्रेस, 11020  कोणार्क एक्सप्रेस आणि 12810 हावडा-छशिमट मेल माटुंगा आणि भाययखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. या गाडीला दादर फलाट क्र. ३ येथे दुहेरी थांबा दिला जाईल आणि गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशीरा पोहोचेल.

पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर स. ११.०५ ते सायं. ४.०५ पर्यंत (बेलापूर-खारकोपर इतर मार्गाव्यतिरिक्त) पनवेलहून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत सुटणारी छशिमट मुंबईकडे जाणा-या अप हार्बर लोकल्स आणि छशिमट येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणा-या डाउन हार्बर सेवा रद्द राहतील. पनवेलहून स. ११.०२ ते दु. ३.५३ पर्यंत  सुटून  ठाण्याकडे जाणा-या अप ट्रान्सहार्बर लोकल सेवा आणि ठाण्याहून सकाळी १०.०१ पासून दुपारी ३.२० पर्यंत पनवेलसाठी सुटणा-या डाउन ट्रान्सहार्बर लोकल सेवा  रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत बेलापूर – खारकोपर आणि नेरुळ-खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे वेळापत्रकानुसार धावतील आणि ब्लॉक कालावधीत छशिमट मुंबई – वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ  दरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरही लोकल उपलब्ध असतील.