ठाण्यात पुन्हा नवीन एकच रुग्ण

ठाणे : शहरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. आज पुन्हा एकदा अवघा एक रुग्ण शहरात आढळून आला आहे तर सात जण रोगमुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. महापालिका हद्दीत वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात अवघा एक रूग्ण सापडला असून उर्वरित प्रभाग समित्यांच्या हद्दीत एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी सात जण रोगमुक्त झाले असून आत्तापर्यंत एक लाख ८१,५८१जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्णालयात आणि घरी ३८ जणांवर उपचार सुरू आहेत. आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून आत्तापर्यंत २,१३०जण दगावले आहेत.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील २४८ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये अवघा एक जण बाधित मिळाला आहे. आत्तापर्यंत २४ लाख १०,९८२ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,र७४९ रूग्ण बाधित सापडले आहेत.