नवरंग नवरात्रीचे…सुहासिनींच्या सौभाग्याचे!

ठाणे: ‘नवरंग नवरात्रीचे..सुहासिनींच्या सौभाग्याचे’ या स्पर्धेत लाल रंगाचे वस्त्र परिधान करून सुमारे २५० महिलांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेचे आयोजन माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १९ मधील महिलांकरिता करण्यात आले आहे.

यावेळी मानाच्या पैठणीची विजेती साठेवाडीमधील स्नेहा नागवेकर ठरली. त्याचप्रमाणे नवरंग २०२३ रास गरबाचे आयोजन प्रभाग क्र.१९ मधील शिवसेना शाखा सेवालाल नगर येथे करण्यात आले होते. या विभागातील सुमारे ३२० महिलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता, विजेत्यांना कलामंदिरची पैठणी, साड्या आणि विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली.