नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची हॅटट्रिक !

६९ खासदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाची घेतली शपथ

नवी दिल्ली : मै नरेंद्र दामोदारदास मोदी… ईश्वर साक्ष शपथ लेता हूँ की, विधिद्वारे स्थापित सच्ची श्रद्धा और निष्ठा से काम करुंगा, असे म्हणत मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत हॅटट्रीक केली. नरेंद्र मोदींसोबत ६९ खासदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.

भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी आज तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवन परिसरात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यासाठी दिग्गजांची मांदियाळी जमली होती. विशेष म्हणजे देशात एनडीएचे सरकार आल्यापासून विविध देशातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटरवरुन अभिनंदन केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर, आजच्या शपथविधी सोहळ्यासही अनेक परदेशी पाहुणे हजर होते. या सोहळ्यासाठी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनंतर राजनाथ सिंह यांनी दुसऱ्या क्रमांकावर, अमित शाह यांनी तिसऱ्या क्रमांकावर तर, नितीन गडकरी यांनी चौथ्या नंबरवर शपथ घेतली. तर, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पाचव्या नंबरवर मंत्रीपदाची शपथ घेतली. मोदी 2.0 सरकारमध्ये अमित शाह यांच्याकडे गृहखाते होते, तर राजनाथसिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालय होते. नितीन गडकरी भूपृष्ठ आणि रस्ते वाहतूक मंत्रिपदाचा पदभार सांभाळत होते. यापूर्वी 10 वर्षे त्यांनी या खात्याचा पदभार सांभाळला आहे. त्यामुळे, मोदी 3.0 सरकारमध्ये गृह आणि अर्थ खाते कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. तर, रजीनीकांत, अक्षय कुमार, शाहरुख खान यांच्यासह अनेक दिग्गज दिसून आले. दरम्यान, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात स्मृती ईराणी, राजीव चंद्रशेखर यासह अनेक नेत्यांना महत्त्वाच्या मंत्रिपदांची जबाबदारी देण्यात आली होती. त्याशिवाय अनुराग ठाकूर यांच्याकडे क्रीडा मंत्रालय होते. दरम्यान, आता मोदी 3.0 मध्ये एकूण 20 नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. पंतप्रधान निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये हे नेते सहभागी झाले नव्हते. यावरून त्यांचा यावेळी मोदी मंत्रिमंडळात समावेश होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन टीममध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळात 27 ओबीसी, 10 एससी, पाच एसटी, पाच अल्पसंख्याक मंत्री असतील.

सर्वप्रथम शपथ घेणाऱ्या २० जणांमध्ये नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जगतप्रकाश नड्डा, शिवराजसिंह चौहान, निर्मला सितारमण, जयशंकर, मनोहरलाल खट्टर, कुमार स्वामी, पियुष गोयल, धमेंद्र प्रधान, जितनराम मांझी, ललनसिंग-जनता दल (नितीश कुमार), सर्वानंद सोनोवाल-आसाम (भाजप), डॉ. विरेंद्र कुमार-मध्य प्रदेश (भाजप), किंजरापूरा नायडू, प्रल्हाद जोशी-मध्य प्रदेश (भाजप), जुएल ओराम, गिरीराज सिंह यांचा समावेश आहे.

प्रफुल्ल पटेलांनी राज्यमंत्रिपदाची ‘ऑफर’ नाकारली

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनाही केंद्रात स्थान मिळणार होते, पण ऐनवेळी त्यांनी नकार दिला. तसेच, आजच्या शपथविधी सोहळ्यालाही त्यांनी हजेरी लावली नाही.

या क्रमाने झाला शपथविधी

१) नरेंद्र मोदी, पंतप्रधान २) राजनाथ सिंह, कॅबिनेट मंत्री (भाजप) ३) अमित शहा, कॅबिनेट मंत्री (भाजप) ४) नितीन गडकरी, कॅबिनेट मंत्री (भाजप,महाराष्ट्र) ५) जे.पी. नड्डा, कॅबिनेट मंत्री (भाजप) ६) शिवराज सिंह चौहान, कॅबिनेट मंत्री (भाजप) ७) निर्मला सितारमन, कॅबिनेट मंत्री (भाजप) ८) एस.जयशंकर, कॅबिनेट मंत्री (भाजप) ९) मनोहरलाल खट्टर, कॅबिनेट मंत्री (भाजप) १०) एच.डी कुमारस्वामी, कॅबिनेट मंत्री (जनता दल) ११) पियुष गोयल, कॅबिनेट मंत्री (भाजप, महाराष्ट्र) १२) धर्मेंद्र प्रधान, कॅबिनेट मंत्री (भाजप) १३) जीतनराम मांझी, कॅबिनेट मंत्री (हिंदुस्थानी अवाम मोर्चा) १४) राजीव रंजन सिंह, कॅबिनेट मंत्री (जनता दल संयुक्त) १५) सर्बानंद सोनोवाल, कॅबिनेट मंत्री (भाजप) १६) वीरेंद्र कुमार, कॅबिनेट मंत्री (भाजप) १७) राम मोहन नायडू, कॅबिनेट मंत्री (टीडीपी) १८) प्रल्हाद जोशी, कॅबिनेट मंत्री (भाजप) १९) जुएल ओराम, कॅबिनेट मंत्री (भाजप) २०) गिरीराज सिंह, कॅबिनेट मंत्री (भाजप) २१) अश्विनी वैष्णव, कॅबिनेट मंत्री (भाजप) २२) ज्योतिरादित्य शिंदे, कॅबिनेट मंत्री (भाजप) २३) भूपेंद्र यादव, कॅबिनेट मंत्री (भाजप) २४) गजेंद्रसिंह शेखावत,कॅबिनेट मंत्री २५) अन्नपूर्णा देवी,कॅबिनेट मंत्री (भाजप) २६) किरण रिजुजू,कॅबिनेट मंत्री (भाजप) २७) हरदीपसिंग पुरी,कॅबिनेट मंत्री (भाजप) २८) मनसुख मांडविय,कॅबिनेट मंत्री (भाजप) २९) जी. किशन रेड्डी,कॅबिनेट मंत्री (भाजप) ३०) चिराग पासवान,कॅबिनेट मंत्री (लोक जनशक्ती पार्टी) ३१) सी.आर. पाटील,राज्य मंत्री (भाजप) ३२) राव इंद्रजित सिंह, राज्य मंत्री (भाजप) ३३) डॉ. जितेंद्र सिंह, राज्य मंत्री (भाजप) ३४) अर्जुन राम मेघवाल, राज्य मंत्री (भाजप) ३५) प्रतापराव जाधव, राज्य मंत्री (शिवसेना,महाराष्ट्र) ३६) जयंत चौधरी, राज्य मंत्री (राष्ट्रीय लोकदल) ३७) जितीन प्रसाद, राज्य मंत्री (भाजप) ३८) श्रीपाद नाईक, राज्य मंत्री (भाजप) ३९) पंकज चौधरी, राज्य मंत्री (भाजप) ४०) कृष्णपाल, राज्य मंत्री (भाजप) ४१) रामदास आठवले, राज्य मंत्री (रिपाई, महाराष्ट्र) ४२) रामनाथ ठाकूर, राज्य मंत्री (डेडीयू) ४३) नित्यानंद राय, राज्य मंत्री (भाजप) ४४) अनुप्रिया पटेल, राज्य मंत्री (अपना दल) ४५) व्ही.सोमण्णा, राज्य मंत्री (भाजप) ४६) चंद्रशेखर पेम्मासानी, राज्य मंत्री (टीडीपी) ४७) एसपी सिंह बघेल, राज्य मंत्री (भाजप) ४८) शोभा करंदलाजे, राज्य मंत्री (भाजप) ४९) किर्तीवर्धन सिंह, राज्य मंत्री (भाजप) ५०) बी.एल. वर्मा, राज्य मंत्री (भाजप) ५१) शंतनू ठाकूर, राज्य मंत्री (भाजप) ५२) सुरेश गोपी, राज्य मंत्री (भाजप) ५३) एल. मुरुगन, राज्य मंत्री (भाजप) ५४) अजय टामटा, राज्य मंत्री (भाजप) ५५) बंडी संजय, राज्य मंत्री (भाजप) ५६) कमलेश पासवान, राज्य मंत्री (भाजप) ५७) भगीरथ चौधरी, राज्य मंत्री (भाजप) ५८) सतीशचंद्र दुबे, राज्य मंत्री (भाजप) ५९) संजय सेठ, राज्य मंत्री, (भाजप) ६०) रवनीत सिंग बिट्टू, राज्य मंत्री (भाजप) ६१) दुर्गादास उईके, राज्य मंत्री (भाजप) ६२) रक्षा खडसे, राज्य मंत्री (भाजप, महाराष्ट्र) ६३) सुकांता मुजूमदार, राज्य मंत्री (भाजप) ६४) सावित्री ठाकूर, राज्य मंत्री (भाजप) ६५) तोखन साहू, राज्य मंत्री (भाजप) ६६) राजभूषण चौधरी, राज्य मंत्री (भाजप) ६७) भूपतीराजू श्रीनिवास वर्मा, राज्य मंत्री (भाजप) ६८) हर्ष मल्होत्रा, राज्य मंत्री (भाजप) ६९) ७०) मुरलीधर मोहोळ, राज्य मंत्री (भाजप, महाराष्ट्र)
७१) जॉर्ज कुरीयन, राज्य मंत्री (भाजप) ७२) पवित्र मार्गेरिटा, राज्य मंत्री (भाजप)