ठाण्यात ‘म्युझिक मंत्रा’ कार्यक्रम

ठाणे: म्युझिक थेरपी-म्युझिक मंत्रा अर्थात णमोकार मंत्रांचे भारतीय संगीत रागदारीत रोज पठण केले तर ते आरोग्यदायी ठरते. स्पिरिच्युअल सिंगर कुमार चॅटर्जी णमोकार मंत्राचे सात वेगवेगळ्या रागदारीमध्ये पठण करून त्याचा स्वास्थ्यासाठी कसा लाभ होतो, याचे सादरीकरण करतात.

तणाव दूर करण्यासाठी, मिश्र मंड रागात णमोकर मंत्र पठण, सिव्हीयर डिप्रेशन घालवण्यासाठी अहिर भैरव रागात णमोकार मंत्र पठण, अस्थमा-लंग्ससाठी, रामदासी मल्हार रागात णमोकार मंत्र पठण, अल्झायमरसाठी भैरवी रागात णमोकार मंत्र पठण, पार्किन्सन्समध्ये मिश्र गावती रागात णमोकार मंत्र पठण, ब्लड प्रेशर-हार्टसाठी प्रखर कल्याण रागात णमोकार मंत्र पठण. या व भक्तामर स्तोत्र, पद्मावती स्तोत्र इत्यादी जैन धर्मातील मंत्र, स्तोत्रावर आधारित आंतरराष्ट्रीय गायक कुमार चॅटर्जी यांचा म्युझिक मंत्राचा शो, सकल जैन समाजासाठी 14 मे 2022 -शनिवार रोजी, रात्री साडेआठ वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे, दिगंबर जैन डॉक्टर्स फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर, मुंबई यांच्या वतीने, निशुल्क आयोजित केलेला आहे.

या प्रस्तुतीचा आनंद नागरिक यु ट्युबवर घेऊ शकतात. या प्रकारच्या रोजच्या पठणाने शरीरातील सप्तचक्र जागृत होऊन आरोग्य चांगले राहू शकते. हा कार्यक्रम ठाण्यामध्ये पहिल्यांदा होत असून सर्वांनी याचा जरूर लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी डॉ.चित्रलेखा मेहता यांच्याशी 9322833675, डॉ.किशोर जैन-9820499006 आणि डॉ.मणिलाल मोता यांच्याशी 9821042294 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.