एकाचवेळी केली शेकडो अतिक्रमणांवर करवाई
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण उपायुक्त पदाची सूत्रे हाती घेताच डॉ.राहुल गेटे यांनी कारवाईचा धडाका लावला आहे.
मागील आठवड्यात सीबीडी बेलापूरमध्ये धडक कारवाई केल्या नंतर बुधवारी वाशीतील एपीएमसी परिसरात सर्जिकल स्ट्राईक करत एकाच वेळी सामाईक जागेत केलेल्या शेकडो अतिक्रमणांवर करवाई करण्यात आली आहे.
नवी मुंबई शहरात छोट्या मोठ्या व्यवसायिकांनी सामाईक जागेवर अतिक्रमण करून त्याचा व्यवसायिक वापर सुरू ठेवला होता. याबाबत मनपा अतिक्रमण तसेच विभाग स्तरावर अनेक तक्रारी धूळखात पडून होत्या.
अतिक्रमण विभागाची सूत्रे हाती घेताच डॉ.राहुल गेटे यांनी तोडक कारवाईचा सपाटा लावला आहे. मागील आठवड्यात सीबीडी बेलापूरमधील वाढीव अतिक्रमणांवर करवाई केल्यानंतर बुधवारी वाशीतील एपीएमसी परिसरात सर्जिकल स्ट्राईक करत अचानक मनपातील सर्व विभागवार फौजफाटा घेऊन एकाचवेळी शेकडो अतिक्रमणांवर करवाई केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कारवाईत बड्या प्रस्थांना सुट?
वाशीतील एपीएमसी परिसरात समाईक जागेचा गैरवापर करणाऱ्यांवर मनपा अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. कारवाई दरम्यान राजकीय पाठबळ असलेल्या काही बड्या व्यवसायिकांना वगळण्यात आल्याने इतर व्यसायिकांनी मनपाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
एपीएमसी परिसरात बऱ्याच व्यापाऱ्यांनी मार्जिनल स्पेसचा गैरवापर आणि पोटमाळे बांधून अतिक्रमण केले होते. येथील गॅरेजवाल्यांनी गाड्यांच्या कामासाठी रस्त्याची अडवणूक केली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. म्हणून या सर्वांवर कारवाई करण्यात आली असून ही कारवाई अशीच पुढे देखील सुरू राहील. ज्या कोणी व्यवसायिकांनी आरोप केले आहेत, त्याची शहानिशा केली जाईल, असे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त
डॉ.राहुल गेटे यांनी सांगितले.