शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहिम सुरुच असून आज दिवा प्रभाग समितीमधील मुंब्रा देवी कॉलनी येथील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली.

कारवाईमध्ये अश्विन कपडेवाला यांचे सेंटमेरीच्या मागे मुंब्रादेवी कॉलनी येथील अंदाजे ३५०० चौ. फुट मोजमापाचे तळ +३ मजल्यावरील कॉलम, राकेश म्हात्रे यांचे अंदाजे २५०० चौ.फुट मोजमापाचे प्लिंथ, राकेश शिंदे यांचे साईनाथ नगर तसेच दिवा आगासन रोड येथील अंदाजे ३००० चौ. फुट मोजमापाचे प्लिंथ निष्कासित करण्यात आले.

सदरची कारवाई अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त अलका खैरे, अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त फारुख शेख, अतिक्रमण विभागाकडील अधिकारी व कर्मचारी व पोलीस विभागाकडील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.