‘ब’ गटात मुंबई पोलीस संघ ‘ब’ अजिंक्य

४७ वी ठाणेवैभव करंडक स्पर्धा

ठाणे: ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर आज झालेल्या रंगतदार ‘ब’ गटातील लढतीत मुंबई पोलीस संघ ‘ब’ ने मर्क स्पोर्ट्स क्लबवर १५ धावांनी मात करीत ४७व्या ठाणेवैभव करंडकावर आपले नाव दिमाखात कोरले.

नाणेफेक जिंकून कर्णधार स्वप्नील कुळयेने फलंदाजी स्वीकारली. पोलीस संघाने ३५ षटकात ९ बाद २०९ धावा केल्या. या लक्षाचा पाठलाग करताना मर्क १५ धावांनी पिछाडीवर पडला.
विजयी संघातर्फे योगेश पाटील ६७ (२७ चेंडूत १ चौकार, ७ षटकार) स्वप्नील कुळये (४०), चमकले तर पराभूत संघातर्फे ३७ धावत २ विकेट्स व नाबाद ५४ (६ चेंडू ४ चौकार) असा अष्टपैलू खेळ करणाऱ्या वैष्णव साईलची गुरु कदम-विक्रांत जोशी पंचांनी सामनावीर म्हणून निवड केली.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे होणार आहे. या प्रसंगी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे अध्यक्ष तर एमसीएचे कार्यकारिणी सदस्य अभय हडप हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील.

संक्षिप्त धावफलक :
मुंबई पोलीस संघ ‘ब’ ३५ षटकात ९ बाद २०९ (आर्यराज निकम २२, रोहित पोळ ३८, स्वप्नील कुळये ४०, योगेश पाटील ६७, वैभव सावंत ६-०-३२-१, सोनू यादव २-०-३६-१, वैभव साहिल ६-०-३७-२, अभिषेक कनोजिया ७-०-२३-३) विजयी वि. मर्क स्पोर्ट्स क्लब ३५ षटकात ८ बाद १९४ (जय दवणे ५०, वैष्णव साईल नाबाद ५४, अभिषेक श्रीवास्तव ४९, योगेश पाटील ४-०-२०-२, सुनील पाटील ७-०-३०-१, आर्यराज निकम ३-०-१९-१)
वैयक्तिक पारितोषिक विजेते
सर्वोत्तम फलंदाज – रोहित पोळ १४८ मुंबई पोलीस संघ ‘ब’
सर्वोत्तम गोलंदाज – समीर भोईर ६-०-५७-६ सरस्वत बँक
सर्वोत्तम अष्टपैलू – वैष्णव साईल (७३ धावात ३ विकेट्स, ६१ धावा) मर्क स्पो. क्लब
विशेष उल्लेखनीय कामगिरी – सत्यजित बॅनर्जी ७-०-१३-५ टाइम्स ऑफ इंडिया