मुंबई पोलीस ब आणि बीएमसी सिक्युरिटी विजयी

ठाणे : ठाणेवैभव वासंतिक क्रिकेट करंडक स्पर्धेच्या ब गटात झालेल्या सामन्यात मुंबई पोलीस ब आणि बीएमसी सेक्युरिटी विजयी ठरले.

४६व्या ठाणेवैभव वासंतिक क्रिकेट करंडक स्पर्धेच्या ब गटात आज गोदरेज स्टाफ आणि मुंबई पोलीस ब संघात लढत झाली. गोदरेज संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. मुंबई पोलीस ब संघाने २० षटकांत सहा गडी गमावून १४५ धावा केल्या. यात तन्मय मयेकरने सर्वाधिक ५७ धावांचे योगदान दिले. गोदरेजकडून अश्रफ खान याने तीन तर प्रशांत खवारे याने दोन गडी बाद केले.

गोदरेजचा संपूर्ण संघ १८.५ षटकांत १२५ धावा करून तंबूत परतला. सागर धनावडे याने ३४ तर प्रवीण घाडगे याने २७ धावा केल्या. मुंबई पोलीस ब संघातर्फे सचिन मोरे आणि सदाशिव जगताप याने प्रत्येकी तीन तर अमित जाधव याने चार बळी घेत मुंबई पोलीस ब संघाला विजय मिळवून दिला.

दुसऱ्या सामन्यात पीडब्ल्युडी संघाने १९.५ षटकांत १२९ धावा केल्या. तर बीएमसी सिक्युरिटी संघाने अवघ्या १०.५ षटकांत १३४ धावा करत पीडब्ल्यूडी संघाचा धुव्वा उडवला.