राज्यात कोरोनाचे एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढतच चालली आहे. सलग तिसऱ्या दिवशी राज्यात एक हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात एक हजार 134 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 563 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज राज्यात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शुक्रवारी 563 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आजपर्यंत एकूण 77,37,355 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.06% एवढे झाले आहेत. राज्यात आज तीन करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा आहे. राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या पाच हजार 127 इतकी झाली आहे. ओमायक्राॅन व्हेरीयंटचे बीए४ आणि बीए५ सब-व्हेरीयंटचा वेगाने प्रसार होत असल्याचं तज्ज्ञांनी निरीक्षण नोंदवले आहे.