मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरले

मनपामार्फत जलपूजन संपन्न

नवी मुंबई : पाताळगंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी नदीवर खालापूर तालुक्यात असलेले 450 द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेचे मोरबे धरण पूर्ण भरले आहे.

गुरुवारी आमदार गणेश नाईक व महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते मोरबे धरण प्रकल्पस्थळी पारंपारिक पध्दतीने जलपूजन करण्यात आले. स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर स्वत:च्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई ही एकमेव महानगरपालिका असून मोरबे धरणामुळे नवी मुंबई ही जलसमृध्द महानगरपालिका म्हणून ओळखली जाते.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त .सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता.अरविंद शिंदे आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. माजी महापौर जयवंत सुतार व सुधाकर सोनवणे, माजी नगरसेवक विनोद म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.