कल्याण : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत इस्पितळांकडून रुग्णांची लूट सुरु असून शासनाने रुग्णांची हि लूट थांबविण्याची मागणी मनसेच्या दिनेश बेलकरे यांनी केली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना यादीकृत व्याधी आणि शस्त्रक्रियेसाठी दीड लाखापर्यंत मोफत उपचार मिळतात. काही उपचारांसाठी ही मर्यादा वाढवून दोन लाखांपर्यंत करण्यात आली आहे. इस्पितलामध्ये या योजनेअंतर्गत उपचार घेत असलेल्या रुग्णांना प्रारंभिक चाचण्या, उपचारादरम्यान केल्या जाणाऱ्या चाचण्या तसेच उपचाराअंती केल्या जाणाऱ्या चाचण्या योजनेअंतर्गत तच समायोजित केल्या जातात. ह्या सर्व चाचण्यांचे पैसे इस्पितळाला मिळतात.
योजनेनुसार या चाचण्यांचा खर्च हा योजनेअंतर्गत नोंदणीकृत इस्पितळा मार्फत होणे गरजेचे आहे. परंतु प्रत्यक्षात रुग्णाच्या योजने संबंधित अज्ञानाचा फायदा घेत, बहुतांश इस्पितळे रुग्णालाच ह्या चाचण्यांचा खर्च करण्यास भाग पाडतात. हे योजनेच्या नियमानुसार वैद्य नाही आहे. अशा पद्धतीने काळाबाजार करणाऱ्या सर्व ईस्पितळांवर कारवाई होणे हे गरजेचे आहे.
योजनेअंतर्गत नोंदणीकृत सर्व इस्पितळांमध्ये योजने संबंधित माहिती तसेच तक्रार निवारणासाठी आरोग्यमित्र नेमलेले असतात. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात काळाबाजार चालू असतानाही, आरोग्य मित्रांकडून रुग्णास हवं तसं सहकार्य लाभत नाही, तसेच इस्पितळाच्या काळ्या बाजाराकडे सुद्धा आरोग्यमित्र जाणून बुजून कानाडोळा करताना दिसतात. त्यामुळे योजनेअंतर्गत उपचार घेत असलेल्या रुग्णांची होणारी ही लूट त्वरित थांबवली गेली पाहिजे, अशी मागणी मनसेचे परिवहन ठाणे पालघर जिल्हा सचिव दिनेश बेलकर यांनी केली आहे.
उपचार घेत असलेल्या एका रूग्णास सरासरी साधारणतः १५ हजारांच्या चाचण्या कराव्या लागतात. योजने अंतर्गातील एका मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात दररोज सरासरी साधारणतः ५ रुग ह्या योजने अंतर्गत दाखल होतात. योजनेअंतर्गत असे १००० रुग्णालय आहेत. म्हणजे रोज ७.५ कोटी आणि वर्षाला २,७३७.५ कोटी हा कमीतकमी आकडा आहे. योजनेअंतर्गातील मोठ मोठ्या ईस्पितळांमध्ये तर रोज योजनेअंतर्गत १०० ते २०० रुग्ण दाखल होतात. यामुळे ही लूट कितीतरी हजारो कोटिंमध्ये असल्याचे बेलकरे यांचे म्हणणे आहे.