मनसेची उत्तरसभा नव्हे उत्तरपूजा; आता विसर्जन!

ना.जितेंद्र आव्हाड यांचे राज ठाकरेंना चोख उत्तर

ठाणे : काल राज ठाकरे यांची उत्तरसभा नव्हती तर उत्तरपूजा होती. आणि उत्तरपुजेनंतर विसर्जन केले जाते, अशी टीका गृहनिर्माण तथा अल्पसंख्यांक मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.

राज ठाकरे यांनी मंगळवारच्या सभेत ना. डॉ. आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका के ली होती. त्या टीके चा ना. आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला.
गुढीपाडव्याला राज ठाकरे यांनी खूप वेळा बाबासाहेबाचे ना ं व घेतले पण, मगळं वारच्या भाषणात बाबासाहेबांच्या लेकरांना जयंतीच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या नाहीत.
पवारसाहेबांनी जातीयवाद वाढविला असे राज ठाकरे म्हणाले. पण, छत्रपती शिवाजी महाराज याच्ं या राज्याभिषेकाला कोणी विरोध के ला होता; छत्रपती शिवाजी महाराजांनी आईला सती न जाऊ देता कर्मकांड नाकारले, हे राज ठाकरे यांना माहित नाही. कारण, दुर्देवाने राज ठाकरे हे फक्त पुरदरे ं वाचत आहेत, असा टोलाही आव्हाड यांनी हाणला. राज ठाकरे हे एवढे भोंग्यांबद्दल बोलत आहेत; मग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जिथे सभा घेतली, तिथे सायलेन्स झोन आहे. त्याचा विसर त्यांना कसा पडला असा प्रश्न आव्हाड यानी उपस्थित ं के ला.

मुंब्य्रात अतिरेकी सापडले, असे राज ठाकरे यानी सा ं ंगितले. पण, आपण सन 2009 पासून मुंब्य्राचे प्रतिनिधीत्व करीत आहोत. पण, केवळ दोन वेळा तिथे अतिरेक्यांच्या रेकॉर्डवरील लोक सापडले; पण, ते देखील बाहेरुन आलेले भाडेकरु होते. ते स्थानिक नव्हते. मुंब्य्रात आता एवढा बदल झाला आहे की, मुंब्य्रात आता लोक वेगळा विचार करीतच नाहीत. अतिरेकी हा जातीधर्माचा नसतो. राज ठाकरे हे कधी साध्वीवर बोलताना दिसले नाहीत. नथुराम हा देशातील पहिला अतिरेकी होता, त्याच्यावर राज ठाकरे कधी बोलत नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांनी बोलताना इतिहास पडताळून घ्यावा. कोण मुस्लीम देशप्रेमी आहे आणि कोण देशद्रोही, याचे सर्टीफिके ट राज ठाकरे हे देणार का? असा खोचक प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे यांनी म्हटले की, शरद पवार हे फक्त शाहू, फु ले, आंबेडकरांचे नाव घेतात. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा फु ले यांनीच शोधून काढली. साधने नसताना केवळ अभ्यासाच्या जोरावर समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी के ली. शाहू महाराज तर त्यांचे वारसच होते. अन् हे दोघांचाही वारसा मी जपतो; त्यांना आदर्श मानत डॉ. बाबासाहेबांनी संविधान लिहिले. त्यामुळे तिघांच्या रक्तात, शब्दात, कृतीत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे या तिघांचेही नाव घेणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्यासारखेच आहे. आम्ही तुकोबाराय आणि शिवरायांचे वारसदार आहोत; अन् सत तुकारामच सा ं गून गेले आहेत ं की, “भले तर देऊ कासेची लगोटी; नाठाळाचे ं माथी हाणू काठी!” त्यामुळे आम्हीही तसेच उत्तर देऊ, असे आव्हाड म्हणाले.