रस्त्यांवरील खड्ड्यात मनसेची रांगोळी

ठाणे : शहरातील रस्त्यांवर वारंवार पडत असलेल्या खडय़ांच्या विरोधात वागळे इस्टेट भागातील इंदिरा नगर भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खड्ड्यात रांगोळी काढून अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले.

ठाणे शहराच्या विविध भागात आजही खड्डेच खड्डे आहेत. महापालिकेच्या माध्यमातून खड्ड्यांवर तात्पुरता मुलामा लावला जात आहे. परत त्याठिकाणी खड्डे पडत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या खड्ड्यांतून ठाणेकरांची मुक्तता व्हावी या उद्देशाने शुक्रवारी मनसेचे शहरप्रमुख रविंद्र मोरे, महिला शहर अध्यक्षा समीक्षा मर्ा्कडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच मतदार संघातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून त्या निमित्ताने त्यांनी आपल्या मतदार संघातील रस्त्यांकडे किमान पहावे, या उद्देशाने इंदिरा नगर भागात रस्त्यावरील खड्ड्यात रांगोळी काढून अनोखे आंदोलन करण्यात आले.