ठाणे: आमदार प्रताप सरनाईक हे मतदारसंघात दैनंदिन कामानिमित्त जात असताना रस्त्यात अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ताफा थांबवून या अपघातात जखमी झालेल्या रुग्णाची आस्थेवाईकपणे विचारपूस करत उपचारासाठी मदत केली.
पोलिसांची मदत घेऊन आमदार प्रताप सरनाईक यांनी जखमी रुग्णाला उपचारासाठी मीरा-भाईंदर येथील स्व. इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात नेताच रुग्णावर डॉक्टरांकडून त्वरीत उपचार करण्यात आले. यावेळी स्वतः सरनाईक यांनी रुग्णासोबत राहून त्याला धीर दिला. तसेच जखमी रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क करून त्यांना याबाबतची माहिती दिली.