मीरा रोड : मीरा-भाईंदर शहरात रस्त्यावर खासगी कं पन्यांचे विविध प्रकारचे के बल, वायर, पाईप टाकले जातात यासाठी रस्ता खोदला जातो. रस्ता खोदताना मनपाकडून परवानगी घेतली जाते. यासाठी ठराविक दर आकारला जातो. त्यातून मीरा-भाईंदर मनपाला २०२१ या आर्थिक वर्षात १०२ कोटी ४९ लाख उत्पन्न मिळाले आहे.
म ी र ा – भ ा ईं द र महानगरपालिके च्य सार्वजनिक रस्त्यावरुन विविध सेवा पुरवठादार कं पन्यांचे के बल, तार , पाईप लाईन अशा प्रकारच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. या वाहिन्या महानगरपालिके च्या जलवाहिन्या , मल वाहिन्या , टाटा पावर व मे.अदानी इलेक्ट्रिसिटी त्यांच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्या, गॅस वाहिन्या, विविध इं टरनेट पुरवठा करणाऱ्या कं पन्यांच्या वाहिन्या, ऑप्टिकल फायबर यांचा समावेश आहे. या सेवा वाहिन्या पुरवठादार कं पनीकडून त्यांच्या वाहिन्या , केबल नवीन टाकण्यासाठी व दरुस्ु ती करण्यासाठी रस्ते खोदण्यात येतात. हे रस्ते खोदण्यापूर्वी महानगरपालिके कडून खोदलेले रस्तेदुरुस्ती व ते पुन्हा बनवण्यासाठी दुरुस्तीचा खर्च , जागेचे भाडे इत्यादी रक्कम वसूल करूनच परवानगी देण्यात येते. कं पनीने विनापरवानगी रस्ते खोदल्यास दंडाची रक्कम वसूल करण्यात येते. तसेच दोष दायित्व कालावधीत असलेले नवीन रस्ते खोदल्यास त्यासाठी दप्पट र ु क्कम घेऊन परवानगी देण्यात येते.
१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाने यासाठी १०२ कोटी ४९ लाख रुपये रक्कम वसूल के ले आहेत. तर हे खोदलेले रस्ते पुन्हा दरुस्ु ती व नवीन बनवण्यासाठी पालिके ला जवळपास ३५ कोटी खर्च करण्यात आला आहे. तर चालू वर्षात परवानगी देण्यासाठी २५ कोटी ३५ लाख रुपये डिमांड नोट देऊन रक्कम भरण्यासाठी कंपन्यांना कळवले आहे. चालू वर्षात आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता , दिपक खांबीत , उपअभियंता यतीन जाधव व सर्व कनिष्ठ अभियंता यांनी खोदाई कामावर नियंत्रण ठे वल्याने चांगली वसुली करण्यात आली असून काही कं पन्यांनी विनापरवानगी खोदाई के ल्यामुळे मोठया प्रमाणात दंड
वसूल करण्यात आला आहे.