मीरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक ऑगस्टमध्येच

आयुक्त ढोले यांचे यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश

भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक येत्या ऑगस्ट महिन्यातच होणार असून या निवडणुकीच्या कामी प्रशासकीय यंत्रणेने सज्ज रहावे, असे आदेश आयुक्त दिलीप ढोले यांनी आज महापालिके च्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत दिले आहेत.

मीरा-भाईंदर महानगरपालिके ची मुदत २७ ऑगस्ट रोजी संपत असून आगामी सार्वत्रिक निवडणुक त्रिसदस्यीय पद्धतीने होणार आहे. या त्रिसस्यीय प्रभागासंदर्भातील प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा महापालिके ने राज्य निवडणुक आयोगाकडे सादर के लेला आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात या वेळी प्रभागांच्या संख्येत वाढ झाली असून १०६ प्रभाग निर्माण करण्यात आलेले आहेत. महानगरपालिके ची सार्वत्रिक निवडणुक लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी मोर्च बांधणीला सुरवात के ली आहे. या शहरात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात महाआघाडी होण्याची सुतराम शक्यता दिसून येत नाही. त्यामुळे या शहरात प्रत्येक प्रभागांमध्ये चौरंगी अथवा पंचरंगी निवडणुका होण्याचीच सर्वाधिक चिन् दहे िसत आहेत. सध्या महानगरपालिकेत भाजपाचे ६१ नगरसेवक आहेत. परंतु या पक्षात भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि जिल्हाध्यक्ष रवि व्यास यांच्यातून विस्तवही जात नसल्याने भाजपा दोन गटात विभागली गेलेली आहे. आजच्या घडीला जिल्हाध्यक्ष अॅड. रवि व्यास यांच्याकडे भाजपाचे विद्यमान १५ नगरसेवक आहेत. तर उर्वरित नगरसेवक मेहता गटाशी संबंधित असल्याचे मानले जात आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी महापालिके च्या वरिष्ठ अधिकार्यांसमवेत आज झालेल्या विषय आढावा बैठकीत या हापालिकेची निवडणूक ऑगस्ट महिन्यातच होईल त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने या निवडणुकीच्या कामाकरीता सज्ज रहावे, असे आदेश सर्व संबंधित अधिकारी वर्गाला दिलेले आहे. यावेळी पावसाळ्यापूर्वी या शहरातील नाले सफाईची कामे मे महिन्याच्या अखेर पर्यंत युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात यावेत असे आदेश देखील आयुक्त ढोले यांनी आरोग्य विभागाला दिलेले आहे.

इतर मागासवर्गीय आरक्षणामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, या महानगरपालिकांच्या निवडणुका काही काळापुरत्या पुढे ढकलल्या आलेल्या आहेत. मात्र हा वाद येत्या काही दिवसांतच संपूष्टात येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याने मीरा-भाईंदर महापालिके ची सार्वत्रिक निवडणुक ऑगस्ट महिन्यातच होईल, असा राजकीय अं दाज वर्तविला जात आहे.