मिलिंद पाटील तंबाखूमुक्त भारत पुरस्काराने सन्मानित

कल्याण भारत पर्यावरण केंद्र, लोधी रोड, नवी दिल्ली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्वास्थ्य प्रबंधन अनुसंधान संस्थान, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ६ वा  तंबाखू आणि आरोग्य या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नरोतम सेखसारिया फाऊंडेशनच्या वतीने तंबाखूमुक्त भारत अवार्ड २०२३-२४ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यावेळी तंबाखूमुक्त कार्य करणाऱ्या भारतातून १० व्यक्तींची निवड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील ठाणे, पालघर जिल्ह्यातील नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांना स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालयचे संचालक डॉ. अतुल गोयल यांनी नरोतम सेखसारिया फाऊंडेशनचा तंबाखूमुक्त भारत २०२३-२४ अवार्ड सलाम मुंबई फाउंडेशनचे प्रतिनिधी, नशाबंदी मंडळाचे संघटक मिलिंद पाटील यांना देऊन सन्मानित करण्यात आले.