म्हाडाची २० टक्के योजनेतील १२०० घरांची सोडत पुढील महिन्यात निघणार आहे. ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण आणि डोंबिवली या मनपा हद्दीमध्ये ही घरे आहेत. मुंबईत हक्काचे घर असावे असे सर्वांचेच स्वप्न असते. म्हाडा मुळे बाराशे जणांचे हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. पुढच्या महिन्यात म्हाडाच्या कोकण मंडळाकडून १२०० घरांची सोडत जाहीर होणार आहे.
या ठिकाणी असतील घरे
मुंबई व आसपासच्या परिसरात आपलं घर असावं अशी ज्यांची इच्छा असते त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. म्हाडाच्या कोकण विकास मंडळाची सोडत ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली या महानगरपालिका हद्द परिसरातील घरांसाठी असणार आहे.
20% योजनेतील घरं, नेमकी योजना काय ?
वीस टक्क्यांची सोडत, ही योजना अशी असते की, जेव्हा चार हजार स्क्वेअर मीटर मधला एखादा गृहनिर्माण प्रकल्प तयार केला जातो, तेव्हा त्यातील 20 टक्के घरे ही म्हाडाला देणे विकासकाला म्हणजेच बिल्डरला बंधनकारक असतात. मग या वीस टक्क्यांमध्ये जी घर येतात त्या घरांसाठी सोडत जाहीर केली जाते. ही घरे सर्वसामान्यांसाठी असतात.