मर्क अंतिम फेरीत दाखल

ठाणे: ४७ व्या ठाणेवैभव करंडक आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या ‘ब’ गटातील उपांत्य फेरीत मर्क स्पोर्ट्स क्लबने अरुप्रीत टायगर्सची 94 धावसंख्या सहा गडी राखून ओलांडत पदार्पणालाच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

63 चेंडूत चार चौकरांसह 45 धावा फटकावणाऱ्या मर्कचा कर्णधार वैभव जावकर यांची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. मुंबई पोलीस संघ ‘ब’ वि. मर्क स्पो.क्ल असा ‘ब’ गटातील अंतिम सामना शुक्रवार, 19 मे रोजी दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होणार आहे.

‘ब’ गट : उपांत्य फेरी

अरुप्रीत टायगर्स एलएलपी 20.4 षटकात 94 (अजय सिंगम 42 चेंडूत 4 चौकार, 3 षटकारांसह 50, अभिषेक गुप्ता 16, निभीष रेडकर 3-0-14-2, श्रेयस केसकर 6.4-2-19-3, अनिकेत खडपे 4-0-21-1, अभिषेक कनोजिया 5-1-19-3) पराभूत वि : मर्क स्पो क्ल 25.2 षटकात 4 बाद 98 (प्रतिम गोतसुर्वे 24, वैभव जावकर 45, अभिषेक श्रीवास्तव नाबाद 39, शुभम वर्मा 5-0-17-1, ऋषिकेश पवार 5-1-12-1, अनिकेत परमार 1-0-3-1)