माजी राष्ट्रपतींनी जागवल्या मैत्रीच्या आठवणी

कै. कांती कोळी यांचा प्रथम स्मृतीदिन

ठाणे : भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज ठाण्यात मैत्रीच्या आठवणी जागवल्या. माजी आमदार कै. कांती कोळी यांच्या प्रथम स्मृती दिनी ते ठाण्यात सहकुटुंब आले होते. त्यावेळी त्यांनी कै. कोळी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

माजी राष्ट्रपती कोविंद यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि कन्या याही आवर्जून उपस्थित होत्या. श्री.कोविंद आणि कोळी कुटुंब यांचे घरोब्याचे संबंध आहेत. कोळी समाजाच्या उन्नतीसाठी दोघांनी प्रयत्न केले होते. मागील वर्षी कै. कोळी यांच्या निधनानंतर तत्कालीन राष्ट्रपती कोविंद यांनी शोकसंदेश पाठवून प्रथम स्मृती दिनी उपस्थित राहणार असल्याचे कळवले होते. त्यानुसार ठाण्यातील सिडको येथील कोळी समाज हॉल येथे आयोजित प्रथम स्मृती दिनाच्या कार्यक्रमास ते उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी कोळी कुटुंबियांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, कोळी समाजाचे आमदार रमेश पाटील यांनीही श्रद्धांजली वाहून जुन्या आठवणी जागवल्या. स्व. कांती कोळी यांच्या पत्नी श्रीमती जयश्री कोळी, मुलगा माजी नगरसेवक मंगेश कोळी, सून नीता कोळी, मुलगा परेश कोळी, सून विद्या कोळी, मुलगी अर्चना केणी, जावई महेश केणी व नातवंडे तसेच कोळी परिवाराची विचारपूस केली.

यावेळी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, कोळी समाजाचे आमदार रमेश पाटील, माजी नगरसेविका नम्रता कोळी, सिने अभिनेते जयवंत वाडकर यांनीही श्रद्धांजली वाहिली.

कार्यक्रमास अखिल भारतीय कोळी समाजाचे सिद्धार्थ कोळी, वेंकट मुद्दीराज, उपाध्यक्ष वसंत संबुटवार, पुष्पा, मढवी, मंगल तांडेल, नारायण पाटील, जनार्दन पाटील, गणेश वैती, मालती पाटील, दत्ता मढवी, माजी नगरसेवक मनोज शिंदे, शिल्पा सोनोने, डॉ. जे. बी. यादव, नंदकुमार मोरे, सचिन शिंदे, तुकाराम डोंगरे, धर्मवीर मेहरोल, प्रेम गौरी, राम भोईर, विजय बनसोडे, कमर शेख, स्वप्नील कोळी, दिलीप मोरे, सुनील भाबळ, सरपंच रामदास ढोले, विजय गौड आदी उपस्थित होते.