रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

ठाणे : मध्य रेल्वेचा मुंबई विभाग रविवारी १ डिसेंबर २०२४ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांमध्ये मेगाब्लॉक परीचालीत करणार आहे.

छशिमट मुंबई ते विद्याविहार दरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर छशिमट मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.१८ पर्यंत सुटणा-या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा छशिमट मुंबई आणि विद्याविहार स्थानकाच्या दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून विद्याविहार स्टेशनपासून पुढे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.१९ पर्यंत सुटणा-या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छशिमट मुंबई स्थानकांच्या दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांच्या दरम्यान थांबतील.
पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत सुटणारी ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत सुटणारी पनवेलकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांच्या दरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असणार आहे.