येत्या रविवारी मेगाब्लॉक

ठाणे : मध्य रेल्वेच्या मुंबई वि•ाागात येत्या रविवारी, 18 सप्टेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय क्षेत्रात मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे.

छशिमट-विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत. छशिमट येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणा-या धीम्या गाड्या छशिमट ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांत थांबतील आणि पुढे पुन्हा डाऊन मार्गावर वळवल्या जातील.

घाटकोपरहून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत  सुटणा-या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छशिमट दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.
ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत
ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ पर्यंत  वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणा-या डाउन ट्रान्सहार्बर सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेलहून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ पर्यंत ठाणेकरीता सुटणा-या अप ट्रान्सहार्बर सेवा रद्द राहतील. ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत हार्बर/मेन मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी असेल.