कल्याण : क्रेडाई एमसीएचआय कल्याण-डोंबिवली युनिट गेली १२ वर्षे लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी ८ ते ११ फेब्रुवारीपर्यंत १३वे प्रॉपर्टी प्रदर्शन कल्याणमधील फडके मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक घर खरेदीदाराला आपल्या पसंतीचे घर हवे असलेल्या ठिकाणी घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध केली असल्याची माहिती एमसीएचआयच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी एमसीएचआयचे रवी पाटील, एक्झीबिशन कमिटी सेक्रेटरी सुनिल चव्हाण, अध्यक्ष भरत छेडा, सेक्रेटरी अरविंद वरक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रदर्शनात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर ते ठाणा, शिळफाटा रोड परिसरातील सर्व सुविधायुक्त घरे बघण्याची संधी कल्याण डोंबिवलीकरांना मिळणार आहे. फक्त १६ लाखांपासून एक कोटीपर्यंत किमतीची घरे प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. बजेटमध्ये बसतील आणि सर्वांना परवडतील अशी मनाजोगी घरे देण्याचा प्रयत्न क्रेडाई एससीएचआय कल्याण-डोंबिवली युनिटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. प्रदर्शनात ४०हून अधिक विकासक १५०हून अधिक प्रोजेक्ट एका छताखाली बघता येणार आहेत. गेल्या अनेक वर्षाचा अंदाज बघता २५ हजारहून अधिक नागरीक भेट देतील असा अंदाज आहे. यावर्षी स्पॉट बुकिंग डिसकाऊंट तर आहेच तसेच प्रत्येक तासाला एक लकी ड्रॉ देखील काढला जाणार आहे. सुप्रसिध्द अभिनेत्री शमिता शेट्टी प्रदर्शनाला भेट देणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर आणि कडोंमपा आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड तसेच अधिकारी आणि अन्य मान्यवर देखील प्रदर्शनाला भेट देणार असल्याची माहिती रवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.