महापौर-उपमहापौर हजर; ठामपा मुख्यालयात लगबग

format: 2; filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; isCameraSense: false; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 0; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 13107200;cct_value: 0;AI_Scene: (13, 0);aec_lux: 254.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?Hazy sunshine, icon:14, weatherInfo:100;temperature: 38;zeissColor: bright;

ठाणे: महापौर उपमहापौरांनी निवडणूक झाल्यानंतर ठाणे महापालिका मुख्यालयात अपेक्षेप्रमाणेच लगबग दिसू लागली आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या दालन परिसरात नागरिक आणि कार्यकर्त्यांची वर्दळ सुरू झाली आहे.

तब्बल साडेतीन वर्षांनंतर ठाणे महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महापौरपदी शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौरपदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक कृष्णा पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुकीला अवघे दोन दिवस झाले असले तरी अपेक्षेप्रमाणे कर्मचारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची लगबग दोघांच्या दालन परिसरात दिसू लागली आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांची निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीअभावी त्यांनी खुर्चीवर बसणे टाळले. अद्याप श्री.शिंदे यांच्या उपस्थितीतच त्या खुर्चीवर बसण्याची त्यांची इच्छा असल्याने सध्या त्या त्यांच्या अँटी चेंबरमध्येच बसू लागल्या आहेत. त्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी, कार्यक्रमाची आमंत्रणे देण्यासाठी, प्रशासकीय कामे आणि समस्यांची निवेदने देण्यासाठी नागरिक, कार्यकर्त्यांची ये-जा दिसू लागली आहे. तर दालन आणि अँटी चेंबरमध्ये कोणतीही असुविधा भासू नये म्हणून कर्मचारी सुद्धा दक्ष दिसत आहेत.

दुसरीकडे भाजपचे उपमहापौर कृष्णा पाटील हे आमदार संजय केळकर, विधान परिषदेचे सदस्य ॲड.निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थितीत दालनातील खुर्चीत विराजमान झालेले आहेत. गेल्या दोन दिवसांत त्यांच्या दालनात भाजपचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिकांचा राबता वाढू लागला आहे.

एकूणच साडेतीन वर्षांनंतर खऱ्या अर्थाने महापालिका मुख्यालयात चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण दिसत आहे. काही दिवसात या दालनांमध्ये अधिकाऱ्यांची लगबग, सर्व मजल्यांवर धावपळ, राजकारणांचे फड, आरोप-प्रत्यारोप, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांची खरडपट्टी असे चित्र पाहायला मिळेल, असे कार्यकर्ते बोलू लागले आहेत.