मराठमोळ्या तरुणाची उद्योग भरारी

प्रोमक्राफ्ट फर्निचर “जो सच्चा हैं….वह अच्छा है….”

घर सजवण्याची नवी पद्धत खास ठाणेकरांसाठी मनात ठेऊन मराठमोळ्या प्रतीक जोशी यांनी प्रोमक्राफ्ट फर्निचर ही संकल्पना ठाण्यात सुरू केली. या संकल्पनेला यंदाच्या वर्षी २३ वर्ष पूर्ण झाले.

मुख्य फॅक्टरी दापोली येथे संपूर्ण कार्यपद्धती असून कामाची रचना केली जाते. या २३ वर्षात वीस हजार लोकांपर्यंत प्रोमक्राफ्ट फर्निचर यांनी त्यांची सेवा दिली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत भारतीय मटेरियल लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रोमक्राफ्ट फर्निचर करत आहेत. भारतातील बर्‍याच राज्यांमध्ये प्रोमक्राफ्ट फर्निचरने त्यांचे सुशोभित किचन आणि फर्निचर या दोन्ही गोष्टी पोहचवल्या आहेत. प्रोमक्राफ्ट फर्निचर माध्यमातून प्रामुख्याने मोड्यूलर कीचन, फर्निचर, बेड्स, कपाट असे बरेच प्रकार आहेत. निसर्गाच्या कुठल्याही झाडांची हानी न करता प्रोमक्राफ्ट फर्निचर त्यांचे मटेरिअल बनवले जाते. या मटेरिअल मध्ये बरेच प्रकार आहेत. घर सजवण्यासाठी ठाण्यातील पहिले हक्काचे ठिकाण असलेल्या प्रोमक्राफ्ट फर्निचर येथे त्यांच्या उद्घाटनासाठी खास नीलेश पाटील यांना बोलवले गेले होते.